Advertisement

माथेरान इथं परदेशी पर्यटकांना प्रवेश नाकारला

कोरोनाचा नवीन व्हेरियंट ऑमिक्रॉननं मुंबईसह जगभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे.

माथेरान इथं परदेशी पर्यटकांना प्रवेश नाकारला
SHARES

कोरोनाचा नवीन व्हेरियंट ऑमिक्रॉननं मुंबईसह जगभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. अशातच आता रायगड जिल्हा प्रशासनानं पर्यटनस्थळांबाबत नवीन माथेरान इथं पर्यटनासाठी आलेल्या ३परदेशी पर्यटकांना नगर परिषद प्रशासनानं प्रवेश नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

या तिन्ही पर्यटकांनी आरटीपीसीआर टेस्ट केली नसल्याचं चौकशीत उघडकीस आलं आहे. ऑमिक्रॉनचा संसर्ग माथेरानमध्ये होऊ नये यासाठी प्रशासनानं सरसकट सर्वच पर्यटकांचे स्क्रिनिंग करण्यास सुरूवात केली आहे.

ऑमिक्रॉनचा फैलाव जगातील अनेक देशांमध्ये झाला असून आपल्या राज्यातही या विषाणूनं बाधित झालेले रूग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळं रायगड जिल्हा प्रशासनानं पर्यटनस्थळांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे.

माथेरान गिरीस्थान नगर परिषदकडून या नवीन नियमावलीच्या प्रती प्रत्येक व्यापाऱ्याला, रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदाराला आणि हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत. माथेरानमध्ये साधारण शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पर्यटक पर्यटनासा येत असतात. हे लक्षात घेऊन माथेरानचे एकमेव प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका इथं प्रत्येक पर्यटकांची स्क्रिनिंग केली जात आहे.

३ परदेशी पर्यटत माथेरानमध्ये आले होते. त्यांच्याकडं आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल नव्हता. त्यामुळे त्यांना माथेरानमध्ये प्रवेश देण्यात आला नाही, असे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले.

सध्या पर्यटनस्थळाची आणि येथील सुरक्षितता महत्वाची आहे. ओमायक्रोनचा प्रादुर्भाव माथेरानमध्ये होऊ नये यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.

या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तिन्ही परदेशी पर्यटकांना परत पाठवण्यात आले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा