कौटुंबिक वादातून आजीने नातीला सहाव्या माळ्यावरून फेकले

सानिया आणि रुकसाना यांच्यात वारंवार खटके उडायचे. हाच वाद शनिवारी विकोपाला गेला. यातून रुकसाना यांच्या मनात मुलगा एजाज, सून सानिया यांच्या बद्दल द्वेषाची भावना निर्माण झाली होती. या दोघांना धडा शिकवण्याचे रुकसाना यांनी मनोमनी ठाणले होते.

कौटुंबिक वादातून आजीने नातीला सहाव्या माळ्यावरून फेकले
SHARES

कुलाबाच्या उच्चभ्रू परिसरात अंधश्रद्धेला बळी पडून माथेफिरूने अल्पवयीन मुलीला इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून फेकत हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, कौटुंबिक वादातून 2 वर्षाच्या मुलीला तिच्याच आजीने इमारतीच्या सहाव्या माळ्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना मालाडच्या  कुरार गाव परिसरात उघडकीस आली आहे. जिया एजाज अन्सारी असे या मृत मुलीचे नाव असून या  प्रकरणी तिची आजी रुकसाना उबेदुल्ला अन्सारी(50) हिला हत्येच्या गुन्ह्यात कुरार पोलिसांनी अटक केली आहे.

 मालाडच्या अाप्पा पाडा परिसरातील एसआरएच्या इमारतीत सहाऴ्या माळ्यावर एजाज खान हे पत्नी सानिया , आई रुकसाना आणि दोन वर्षाची मुलगी जिया यांच्यासोबत रहात होते. जिया ही सावत्र नात होती. तरी ही जियाचा लाड घरात सर्वच करायचे. अनेकदा जिया ही रुकसानाच्या सख्या नातवाला मारायची, तिचे खेळणे हिसकावून घ्यायची यावरून रुकसानाचा जियावर राग होता.  हाच राग शनिवारी विकोपाला गेला.

कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल

दरम्यान शनिवारी दुपारी एजाजची 2 वर्षांची मुलगी जिया ही घरासमोरील गँलरीत खेळत होती.  त्यावेळी तिने रुकसानाच्या नातवाकडून तिने खेळणे हिसकावून घेतले. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने रुकसानाने जियाला सहाव्या माळ्यावरून फेकून देत शांतपणे घरात येऊन बसली. काही वेळानंतर इमारतीतील काही रहिवाशांनी जिया रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे पाहिले. ते धावत एजाज यांच्या घरी आले. त्यांनी जिया पडून जखमी झाल्याचे सांगितल्यावर तिला तातडीने जवळील शासकिय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दाखल करताक्षणीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिची माहिती मिळाल्यानंतर कुरार पोलिसांनी सुरूवातीला अपमृत्यूची नोंद केली. सुरूवातीला जियाचे पडणे हा अपघात असल्याचा पोलिसांचा समज होता. माञ चौकशीत रुकसानाने जियाला कौटुंबिक वादातून इमारतीच्या सहाव्या माळ्यावरून फेकल्याचे कबूल केले. जियाच्या हत्ये प्रकरणी सानियाने दिलेल्या तक्रारीनुसार रुकसानाला कुरार पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी कुरार पोलिस अधिक तपास करत आहेत.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा