SHARE

नालासोपारा स्फोटकासाठी पैशांची मदत करणाऱ्या आणि प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या श्रीकांत पांगेरकराच्या मित्राला एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. गणेश कपाळे असे या संशयिताचे नाव आहे. गणेशचे झेराॅक्स आणि डिटीपी सेंटर त्याच्या कार्यालयातील संगणकात पांगरकरने स्फोटकाप्रकरणी पाठवलेले काही ई-मेल मिळून आले असल्याचं एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.


कपाळे एटीएसच्या ताब्यात

जालना येथील शनि मंदिर चौकात कपाळेचं घर असून काही अंतरावरच त्याचं झेराॅक्स आणि डीटीपीचं सेंटर आहे. मागील अनेक महिन्यांपासून कपाळे हा पांगरकरच्या संपर्कात होता. पांगरकरजवळून पोलिसांनी हस्तगत केलेल्या संगणक आणि इतर कागदपत्रात कपाळेच्या तो संपर्कात असल्याचे निदर्शनास आले.
पांगरकरने स्फोटकप्रकरणातील अनेक संशयास्पद ईमेल हे कपाळेला केले होते. या मेलचा माघ काढतच एटीएसचे अधिकारी कपाळेपर्यंत पोहचले.

बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास एटीएसचे पोलिस कपाळेच्या घरी गेले. कपाळेचे संगणक, पेनड्राइव्ह आणि इतर साहित्यासह त्यांनी कपाळेला ताब्यात घेतले. या प्रकरणी एटीएसने कोणतंही अधिकृत स्पष्ठीकरण दिलेलं नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या