इसिसचे संशयित ताब्यात

 Mumbra
इसिसचे संशयित ताब्यात
इसिसचे संशयित ताब्यात
See all
Mumbra, Mumbai  -  

इसिसशी संबध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने मुंब्र्यावरून तिघांना ताब्यात घेतले असून, इसिसमध्ये भर्ती करणाऱ्याला एकाला अटक करण्यात आली आहे. मुंब्रा परिसरातून अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव नाजिम शमशाग अहमद(26)असून, त्याच्यावर इसिसमध्ये तरुणांच्या भर्तीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. इतर दोघांची सध्या एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे.

मुंबईसह लुधियाना (पंजाब), नरकाटियागंज (बिहार), बिजनोर (उत्तर प्रदेश) आणि मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. या कारवाईत उत्तर प्रदेश एटीस आणि दिल्ली पोलिसांसोबत आंध्रप्रदेश, बिहार, पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांचाही समावेश होता. सर्व राज्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले तिघेही देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत होते.

Loading Comments