पालघर स्फोटकं : टार्गेट मुंबईच?


पालघर स्फोटकं : टार्गेट मुंबईच?
SHARES

पालघर - सातवली गावात सापडलेली स्फोटकं म्हणजे आरडीएक्सच असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे एकच खळबळ उडालीय. ही स्फोटकं सापडल्यानंतर देशभरातल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलीस आणि एटीएसनंही बंदोबस्तात वाढ केलीय. मुंबईच्या वेशीवरच स्फोटकांचा मोठा साठा सापडल्यानं, पुन्हा एकदा मुंबईच दहशतवाद्यांचं टार्गेट होती का असा प्रश्न निर्माण झालाय.

२७ तारखेला पालघरमधल्या सातवली गावात एटीएसच्या टीमनं ही स्फोटकं जप्त केली आहेत. या स्फोटकांच्या साठ्यात आरडीएक्स, जिलेटीनच्या कांड्या आणि डिटोनेटर्सचाही समावेश आहे. पालघर हे समुद्राला लागून असल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलंय.
सातवली गावात मोठ्या प्रमाणात स्फोटकं असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीची खातरजमा होईपर्यंत एटीएसनं मोठी गुप्तता पाळली होती. 27 तारखेला छापा घालून 15 ते 20 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती. तसंच पाच जणांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.

"एटीएस सध्या याचा तपास करतंय. स्फोटकांचा कुणाशी संबध आहे, याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या याबाबत कोणतंही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही," अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी मुंबई लाइव्हच्या टीमला दिली. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा