शक्तीमिल गँगरेपमधील तडीपार आरोपीवर चाकूने हल्ला

शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आकाश जाधव उर्फ गोट्या या अल्पवयीन आरोपीला न्यायालयने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र ऐवढ्या भयंकर प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्या वागणुकीत काहीच बदल आढळून आलेला नाही. एका मागोमाग एक त्याच्यावर होणाऱ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी त्याच्यावर तडीपारची कारवाईही केली.

शक्तीमिल गँगरेपमधील तडीपार आरोपीवर चाकूने हल्ला
SHARES

शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आकाश जाधव उर्फ गोट्या या अल्पवयीन आरोपीला न्यायालयने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र ऐवढ्या भयंकर प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्या वागणुकीत काहीच बदल आढळून आलेला नाही. एका मागोमाग एक त्याच्यावर होणाऱ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी त्याच्यावर तडीपारची कारवाईही केली.

मात्र तडीपार असताना परिसरात येऊन पुन्हा दादागिरी करणाऱ्या आकाशवर सोमवारी विरुद्ध गटाने चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आकाशवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मारेकऱ्यांवर आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

आग्रीपाडा पोलिसांची कारवाई

मुंबईतल्या बहुचर्चित शक्तीमिल येथे 31 जुलै 2013 मध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणात न्यायालयाने चार जणांना अटक केली होती. त्यात आकाशचाही समावेश होता. मात्र त्यावेळी आकाश अल्पवयीन असल्यानं त्याला न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र शिक्षा भोगून आल्यानंतर देखील आकाशच्या वागणुकीत फार काही बद्दल घडला नाही.

उलट या ना त्या कारणांवरून त्याच्या पोलिसांच्या वाऱ्या चालूच होत्या. पोलिस कोठडीतून शिक्षा भोगून आल्यानंतर धमकावणे, जिवे मारण्याचा प्रयत्न यांसारखे तब्बल 5 गुन्हे पोलिसांनी आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात नोंदवले. याशिवाय दोन अदखलपात्र गुन्ह्यांचीही आकाशवर नोंद आहे. आकाशवरील वाढत्या गुन्ह्यांच्या आलेखावरूनच आग्रीपाडा पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई म्हणून मे 2018 मध्ये तडीपारची नोटीस काढली. त्यानंतर काही दिवस आकाश फरार होता. 

पूर्ववैमन्यसातून हल्ला

सोमवारी पोलिसांची नजर चुकवून आकाश त्याच्या परिसरात आला होता. याच संधीचा फायदा घेऊन पूर्ववैमन्यसातून राग धरून राहिलेल्या काही जणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात गोट्याच्या पोटावर वार करण्यात आला असून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 307(हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोट्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम आगावणे यांनी दिली.

हेही वाचा - 

नशा बेतला जीवावर, कार अपघातात एकाच मृत्यू, दोन जखमी

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा