विनयभंग प्रकरणी रिक्षा चालकाला अटक

रिक्षाच्या आरशात महिलेला पाहून गैरवर्तन करत होता. सुरूवातीला तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र चालकानं स्वत:ला आवर न घालता त्याचे चाळे वाढू लागले. त्यावेळी महिलेनं तो सर्व प्रकार मोबाइलमध्ये कैद करून मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला.

विनयभंग प्रकरणी रिक्षा चालकाला अटक
SHARES

मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी एका महिलेचं विनयभंग केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक केली आहे. चालक रिक्षात बसलेल्या महिलेला रिक्षाच्या आरशात पाहून गैरवर्तन करत होता. या घटनेची माहिती महिलेनं ट्विटरद्वारे पोलिसांनी कळवली. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला अटक केली.

महिलेला पाहून गैरवर्तन

कांदिवलीच्या हनुमाननगर परिसरात राहणाऱ्या महिलेनं २९ जुलैला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास स्टेशनला जाण्यासाठी पकडली. त्यावेळी आरोपी रिक्षाचालक प्रवासादरम्यान रिक्षाच्या आरशात महिलेला पाहून गैरवर्तन करत होता. सुरूवातीला महिलेनं दुर्लक्ष केलं. मात्र, चालकानं स्वत:ला आवर न घालता त्याचे चाळे वाढू लागले. त्यावेळी महिलेनं तो सर्व प्रकार मोबाइलमध्ये कैद करून मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केलं. 


शेकडो सीसीटिव्हींचा तपास

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबधित कांदिवली पोलिसांकडे तक्रार वर्ग केला. कांदिवली पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीनं रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी शेकडो सीसीटिव्ही तपासल्यानंतर रिक्षा चालकाला पोलिसांनी शोधून काढत त्याला ३५४(अ), ५०९ भा.द.वि कलमांतर्गत  गुन्हा नोॆदवत अटक केली. आरोपीचे नाव अद्याप समजू शकले नसून बातमीला एका वरिष्ठ अधिकार्याने दुजोरा दिला.



हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला

राज ठाकरे ममता दीदींच्या भेटीला, ईव्हीएमविरोधाला मिळणार बळ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा