पोलिसांच्या गाडीने दिली कारला धडक


पोलिसांच्या गाडीने दिली कारला धडक
SHARES

मालाड - पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारला पोलिसांच्याच गाडीने धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यासमोर कार पार्क केली होती. तेव्हा 16 जानेवारीला दुपारी दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या कारचे मालक मनोहर चौधरी यांनी याची तक्रार मालवणी पोलिसांत केली असता आधी तक्रार घेण्यास नकार दिला, पण मनोहर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विनंती केल्यानंतर पोलिसांनी फक्त चालकाविरोधात एनसी दाखल केली. पण पुढची कारवाईच केली नसल्याचा आरोप मनोहर चौधरी यांनी केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा