आयोध्यावर उद्या निकाल, सोशल मिडियावर पोलिसांची नजर

अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीचा निकाल आता कोणत्याही क्षणी लागू शकतो. या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

आयोध्यावर उद्या निकाल, सोशल मिडियावर पोलिसांची नजर
SHARES

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक  ब्रिजेश सिंग उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत फेसबुक, इन्स्टाग्रामचे अधिकारी व राज्याच्या विविध जिल्हा प्रमुखांसह 50 पोलिस अधिकारी उपस्थित होते. उद्याच्या निकालावर सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये. कशा पद्धतीने सोशल मिडियावरील वादग्रस्त मजकूर काही क्षणात सोशल मिडियावरून  कसा काढावा. याबाबतचे मार्गदर्शन देण्यात आले आहे.

अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीचा निकाल आता कोणत्याही क्षणी लागू शकतो. या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयानं सर्वच महत्त्वाच्या राज्यांना एक पत्र पाठावलं आहे. यामध्ये राज्यातील गरज असलेल्या संवेदलशील ठिकाणी अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांना सार्वञिक नोटीसा काढून जिल्ह्यात जमाव बंदी जाहिर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर निकालानंतर कोणताही जल्लोष, बाईक रँली, आंदोलन, गोड पदार्थांच वाटप, संबधित विषयाला  अनुसरून जाहिरातीचे फलक, महाआरती अथवा समुह पठन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

त्याच बरोबर देवदेवतांसंबधी कोणताही बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमांवर झळकविण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत. तसेच व्हाटस अँपवर बदनामी कारक, धार्मिक भावना दुखावतील, जुने प्रकशोभक भाषणांचे व्हिडिओ टाकणे, व्हाँट्स अँपवर आलेले वादग्रस्त मेसेज पुढे टाकणाऱ्यांवर ही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. तरी नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाकडून  देण्यात येणारा निर्णय स्विकारून कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार  याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा