पत्नीला ढोंगी बाबाच्या ताब्यात देणारा पती गजाआड

 Kandivali
पत्नीला ढोंगी बाबाच्या ताब्यात देणारा पती गजाआड

मालाड - येथील स्काटर कॉलनीत राहणाऱ्या महिलेने पती आणि ढोंगी बाबाविरोधात दिंडोशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा पती मूल होत नाही म्हणून पत्नीला एका ढोंगीबाबाकडे घेऊन गेला. यावेळी ढोंगी बाबाने महिलेला नशेचे औषध देत तिच्यासोबत दुष्कर्म केले. विशेष म्हणजे पतीला हा सगळा प्रकार माहीत असूनही त्याने तिला तीन वेळा ढोंगी बाबाच्या ताब्यात दिले. अखेर ढोंगीबाबा आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, फरार ढोंगी बाबाचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading Comments