चोर पडले 'उघडे'


चोर पडले 'उघडे'
SHARES

वांद्रे - लोकलच्या दरवाजावर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लांबवणाऱ्या दोघा अट्टल चोरांना वांद्रे जीआरपीने अटक केली आहे. हे चोर आपण कुणाला दिसू नये म्हणून उघड्याने सिग्नलवर चढत आणि लोकलच्या दरवाजावरील प्रवाशांना लक्ष्य करत.
मोहम्मद अली शेख उर्फ मल्ली (२१) आणि मोहम्मद अली हनन शेख उर्फ मुन्ना (१९) अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे या दोघांना पोलिसांनी पकडले तेव्हा देखील ते उघडेच होते. हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.मोहम्मद अली शेख वर पाच तर अली हनन शेख वर ३ गुन्हे नोंद आहेत.
त्यापैकी मोहम्मद अली हा सिग्नल वर चढायचा. त्यानंतर लोकलच्या डोअरवर उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाईल किंवा बॅग हिसकावून घ्यायचा. तर त्याचा साथीदार अली हनन शेख हा खाली थांबून पडलेला ऐवज ताब्यात घ्यायचा.
शनिवारी सकाळीही हे दोघे नेहमीप्रमाणे माहिमच्या खाडीवर दबा धरून बसले होते. सकाळी 9. 30च्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या दरवाजावरील महिलेला त्यांनी लक्ष्य देखील केले. नंतर तिच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला. मात्र पोलिसांनी त्यांना हेरले आणि पाठलाग करून रंगेहात पकडले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा