कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी; २ जणांना पोलिसांकडून अटक

धावत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणं २ जणांच्या अंगलट आलं आहे.

कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी; २ जणांना पोलिसांकडून अटक
SHARES

धावत्या कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणं २ जणांच्या अंगलट आलं आहे. संबंधित २ जण स्टंटबाजी करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मोहम्मद गुलफाम अन्सारी (२५), मोहम्मद इम्रान अन्सारी (२७) अशी या दोघांची नावे आहेत.

मुंबईच्या वांद्रे परिसरात जीव धोक्यात घालून गाडी चालवणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण चाल्या गाडीच्या चक्क बोनटवर बसला असून चालक गाडी वेगात चालवताना दिसत आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी गाडीच्या नंबर पडताळून दोघांवर कारवाई केली आहे.

या घटनेतील दोन्ही आरोपी कुर्ला परिसरात राहणारे असून एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ही सोमवारी रात्री उशिरा घडली असून वांद्रे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, अशा अनेक घटना आपण सोशल मिडियावर वारंवार पाहत असतो. चारचाकी, दुचाकीसोबत असे स्टंट करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र असे जीवघेणे स्टंट करणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे यांना वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याने पोलिसीह यावर योग्य ती कारवाई करत असतात.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा