भाभा रिसर्च सेंटरमधून महिला गायब

मुंबई - भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून एक महिला वैज्ञानिक अचानक गायब झालीय. बबिता सिंग असे या महिला वैज्ञानिकाचे नाव आहे. बबिता नेरुळच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. 23 जानेवारीला तिच्या नेरुळच्या घरातून ती गायब झाली. गायब होण्यापूर्वी बबिताने आपल्या कुटुंबियांना इमेल केला आहे. या इमेलमध्ये तिने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत.  

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे बबिताने इमेलमध्ये नमूद केले आहे.

बबिता गायब असल्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. बबिताचे कुटुंब मुंबईत दाखल झाले आहे. पण भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर प्रशासनाकडून कुठलीही मदत केली जात नाहिये, असा आरोप बबिताच्या कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे बबिताचे कुटुंबिय स्वत: रस्त्यावर उतरून तिचा शोध घेत आहेत.

Loading Comments