बेस्ट बसचे बनावट पास बनवणारी टोळी अटकेत

बेस्ट बसने पास बनवण्यासाठी कंत्राट दिलेल्या ट्रायमॅक्स कंपनीतील अनिकेत जाधव या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही टोळी बनावट पास बनवत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

बेस्ट बसचे बनावट पास बनवणारी टोळी अटकेत
SHARES

बेस्ट बसचे बनावट पास बनवणाऱ्या टोळीचा चेंबूर पोलिसांनी पर्दाफाश करत ५ जणांना अटक केली आहे. अनिकेत जाधव, पाशा शेख, अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, कुशाल पाटील अशी या आरोपींची नावे आहेत. बेस्ट बसने पास बनवण्यासाठी कंत्राट दिलेल्या ट्रायमॅक्स कंपनीतील अनिकेत जाधव या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही टोळी बनावट पास बनवत असल्याचं निदर्शनास आलं आहे.


बनावट पास कसा पकडला?

चेंबूरच्या म्हाडा काॅलनी परिसरात गुरूवारी बेस्टचे तिकिट निरीक्षक राम शिंदे हे प्रवाशांची तिकिट तपासत होते. त्यावेळी कुर्ला बेस्ट स्थानकावरून आलेल्या बेस्ट बस क्रमाक ३६९ मधून उतरलेल्या पाशा शेख या प्रवाशाचा पास शिंदे यांनी तपासला असता त्यांना पासमध्ये काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. शिंदे यांनी पाशाला कुर्ला बस स्थानकात नेत पास पुन्हा तपासल्यावर तो बनावट असल्याचं उघडकीस आलं.


आरोपीचे धागेदोरे

या प्रकरणी शिंदे यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी पाशाकडे केलेल्या चौकशीतून वडाळा डेपो येथील अनिकेत जाधवचं नाव पुढे आलं. वडाळा बेस्ट डेपो इथं बेस्ट बसचे पास बनवण्याचं कंत्राट दिलेल्या ट्रायमॅक्स कंपनीत अनिकेत कामाला आहे. अनिकेतच्या चौकशीत त्याने अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, कुशाल पाटील या ३ एजंटच्या मदतीने हा गोरखधंदा सुरू केल्याची कबुली दिली.


अनेकांना पास विकले

पोलिसांनी अनिकेतच्या घराची झडती घेतली असता. पोलिसांना त्याच्याजवळ बेस्ट बसचे ३७ बनावट पास आढळून आले आहेत. तसंच या टोळीने आतापर्यंत ३०० ते ४०० जणांना हे बनावट पास विकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा-

बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रूपयांचं सानुग्रह अनुदान

दिवाळीत बेस्टच्या १५४ जादा गाड्या



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा