Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रूपये बोनस


बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रूपये बोनस
SHARES

बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. यंदाच्या दिवाळीला बेस्ट कर्मचाऱ्यांना ५५०० रूपये बोनस मिळणार आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात साजरी होणार आहे.


विशेष बैठकीत निर्णय

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही १५ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी बेस्टचे कर्मचारी सतत करत होते. कर्मचाऱ्यांच्या या मागणीबाबत गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या बैठकीत बोनसबाबत कोणताही निर्णय न झाल्याने शुक्रवारी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच जाहीर केलं.


आगाऊ रक्कम

याआधी २०१६-१७ मध्ये बेस्टला महापालिकेतर्फे सानुग्रह अनुदानासाठी अागाऊ रक्कम देण्यात आली होती. बेस्टने या रकमेतून कर्मचाऱ्यांना ५५०० रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. परंतु, बेस्ट उपक्रमात आर्थिक सुधारणा न झाल्याने ही रक्कम ११ सामान हप्त्यामध्ये कापून घेण्यात आली.


कामगरांचा विजयी मेळावा

कर्मचाऱ्यांना बोनस न मिळाल्याने रविवारी ४ नोव्हेंबर रोजी शिवसेना भवन इथं संध्याकाळी ५ वाजता कर्मचाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत महाव्यवस्थापकांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केल्याने हा मेळावा आता विजयी मेळावा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
- सुहास सामंत, बेस्ट समिती सदस्य



हेही वाचा-

बोनससाठी गुरूवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

दिवाळीत बेस्टच्या १५४ जादा गाड्या



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा