Advertisement

बोनससाठी गुरूवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

उचल रकमेऐवजी बेस्ट कामगारांना पंधरा हजार रुपये बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी करत जोपर्यंत कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा पवित्रा युनियनने घेतला अाहे.

बोनससाठी गुरूवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कामगारांनाही पंधरा हजार रुपये बोनस मिळावा यासाठी गुरुवारपासून इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता वडाळा आगारासमोर या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.  


बोनस मिळेपर्यंत अांदोलन

उचल रकमेऐवजी बेस्ट कामगारांना पंधरा हजार रुपये बोनस जाहीर करण्यात यावा अशी मागणी करत जोपर्यंत कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असा पवित्रा युनियनने घेतला अाहे. त्यामुळं गुरुवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचा बोनसचा प्रश्न सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


मेणबत्ती मोर्चाची हाक 

याआधी, बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार, दिवाळीपूर्वी २० टक्के दराने बोनस मिळवा यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान ते आझाद मैदानापर्यंत बुधवारी संध्याकाळी ६ वाजता मेणबत्ती मोर्चा काढण्याचा इशारा या संघटनेनं दिला होता.हेही वाचा - 

ओला, उबरच्या चालक-मालकांच्या संपावर गुरुवारी निघणार तोडगा?

प्रवाशांसाठी दिवाळी गिफ्ट, 'परे'वर धावणार १० नवीन लोकलफेऱ्या
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा