Advertisement

प्रवाशांसाठी दिवाळी गिफ्ट, 'परे'वर धावणार १० नवीन लोकलफेऱ्या


प्रवाशांसाठी दिवाळी गिफ्ट, 'परे'वर धावणार १० नवीन लोकलफेऱ्या
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर गुरुवार दि. १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या नव्या वेळापत्रकात दहा नवीन लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून १२२ फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये ११० फेऱ्या हार्बरवरील आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना ही दिवाळी गिफ्ट ठरणार आहे.


जादा लोकल सुरू

१ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकानुसार, चर्चगेट ते डहाणूपर्यंत एक जलद फेरी, चर्चगेट ते विरारसाठी दोन लोकल आणि विरार ते डहाणूपर्यंत एका धिम्या गतीच्या लोकलचा समावेश करण्यात आला आहे. तसंच, विरार ते चर्चगेटसाठी दोन, डहाणू ते विरारसाठी दोन, विरार ते बोरिवली आणि भाईंदर ते अंधेरीसाठी जादा लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसभर चालणाऱ्या फेऱ्यांची संख्या १,३५५ वरून १,३६५ वर जाणार आहे.

महिला विशेष लोकल फेऱ्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. महिला विशेष लोकल फेऱ्यांमध्ये चर्चगेट स्थानकातून सायंकाळी ६.५१ वाजता सुटणारी चर्चगेट-भाईंदर महिला विशेष लोकल विरापर्यंत धावणार आहे.


'या' स्थानकात थांबा

भाईंदर स्थानकातून सुटणारी सकाळी ८.४४ वाजताची लोकल विरार स्थानकातून आणि वसई रोडहून ९.५६ वाजता सुटणारी वसई रोड-चर्चगेट महिला लोकल विरारमधून सकाळी ९.४७ वाजता सुटणार आहे. त्याचप्रमाणे वातानुकूलित लोकल गाडीला मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहीसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.


लोकलच्या वेळापत्रकात बदल

  • चर्चगेट ते डहाणू रोड जलद लोकल सकाळी ८.५६ वाजता सुटेल
  • चर्चगेट ते विरार जलद लोकल सकाळी १०.५७ वाजता सुटेल
  • चर्चगेट ते विरार जलद लोकल दुपारी १.४९ वाजता सुटेल
  • विरार ते डहाणू रोड धिमी लोकल दुपारी ३.४५ वाजता सुटेल
  • विरार ते चर्चगेट जलद लोकल सकाळी ६.११ वाजता सुटेल
  • विरार ते बोरिवली धिमी लोकल सकाळी ७.१८ वाजता सुटेल
  • भाईंदर ते अंधेरी धिमी लोकल सकाळी ८.५० वाजता सुटेल
  • विरार ते चर्चगेट जलद लोकल सकाळी १०.२५ वाजता सुटेल
  • डहाणू रोड ते विरार धिमी लोकल दुपारी १२ वाजता सुटेल
  • डहाणू रोड ते विरार धिमी लोकल संध्याकाळी ४.०५ वाजता सुटेल
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा