अशा विकृतांना कोण आळा घालणार?


SHARES

मालाड - पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुलींनो सावधान! चित्रात दिसणाऱ्या या नराधमाची तुमच्यावर नजर आहे. इमारतीच्या पार्किंग मध्ये, लिफ्ट मध्ये, सुनसान रस्त्यावर कुठेही हा नराधम तुम्हाला गाठू शकतो आणि त्यानंतर हा काय करेल याचा मात्र काही नेम नाही. हा जे काही करतो ते अतिशय अश्लील आहे हे मात्र नक्की. काही महिन्यांपूर्वी मालाड परिसरातील एक लहान मुलगी आपल्या लहानग्या भावाला खेळवत होती. त्यावेळी हा नराधम बिल्डिंगमध्ये आला आणि अश्लील चाळे करू लागला. या मुलीला तोपर्यंत काही कळले नाही जो पर्यंत या अश्लील माणसाने तिला हात लावला नाही, पण मुलगी लहान असल्याने ती काही करू शकली नाही. सुदैवानं त्याचवेळी इमारतीत राहणारा एक मुलगा बाहेर आला. मुलीने सगळा प्रकार सांगताच हा तरुण या नराधमाला पकडायला धावला खरा, पण तो पर्यंत हा नराधम सटकला. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

मुंबईच्या मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप हा नराधम मोकाटच आहे. विशेष म्हणजे याने मालाड मध्ये कांदिवलीत देखील अश्या प्रकारची कृत्य केल्याचं समोर आलाय. या अश्लील माणसाला तुम्ही बघितल्यास त्याची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा मुंबई लाईव्ह द्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा