भांडुपकर तरूणाचा धुळे अपघातात मृत्यू

 Bhandup
भांडुपकर तरूणाचा धुळे अपघातात मृत्यू

भांडुप - धुळ्यात कार अपघातात भांडुपमध्ये राहणा-या एका तरूणाचा मृत्यू झालाय. स्वप्नील ताडगे असं या तरूणाचं नाव आहे. स्वप्नीलने तरूणपणी सामाजिक कार्यात उडी घेतली होती. मनसे पक्षाच्या १०७ शाखेचा तो माजी उपशाखा प्रमुख होता. गेल्या चार वर्षांपासून तो धुळ्यात स्थायिक झाला असला तरी भांडुपशी असलेली त्याची नाळ, अोढ तुटली नव्हती. त्याच्या अकाली जाण्याने भांडुपमध्ये शोककळा पसरली आहे.

Loading Comments