उत्तन समुद्र किनाऱ्यावरील हाॅटेलमध्ये रेव्ह पार्टी; पोलिसांचा छापा


उत्तन समुद्र किनाऱ्यावरील हाॅटेलमध्ये रेव्ह पार्टी; पोलिसांचा छापा
SHARES

भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावरील मॅजिक किचन हाॅटेलवर शनिवारी रात्री रेव्ह पार्टी चालवत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा मारला. हाॅटेलचे मालक अतुल शरद शेट्टी हाॅटेलमध्ये रेव्ह पार्टी चालवत असल्याची खबर पोलिस उपअधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांनी मारलेल्या छाप्यात हाॅटेलमधून मोठ्या प्रमाणावर हुक्का, दारू अाणि वेश्या व्यवसायासाठी अाणलेल्या तीन मुलींना ताब्यात घेतलं अाहे.


४ जणांना अटक

भाईंदरचे पोलिस उपअधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तनमधील मॅजिक किचन हाॅटेलमध्ये रात्री उशिरपर्यंत पार्टी चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांनी अापल्या टीमसह हाॅटेलवर छापा मारला. यावेळी हाॅटेलचा मालक शरद शेट्टीसहीत त्याचा मॅनेजर अाणि २ कर्मचाऱ्यांना अटक केली. तर हाॅटेलमध्ये पार्टी करणाऱ्या ग्राहकांना नोटिस देऊन सोडण्यात अालं. 



हेही वाचा -

मनसेच्या नगरसेवकाला का झाली अटक? वाचा

नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा