मनसेच्या नगरसेवकाला का झाली अटक? वाचा...

मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना कंत्राटदाराला केलेल्या मारहाणीप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. ५० हजार रुपये खंडणी न दिल्यामुळे आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे.

मनसेच्या नगरसेवकाला का झाली अटक? वाचा...
SHARES

कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. ५० हजार रुपये खंडणी न दिल्यामुळे आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तुर्डे यांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.


संपूर्ण प्रकार

कुर्लाच्या वार्ड क्रमांक १६६ चे मनसेचे एकमेव नगरसेवक म्हणून संजय तुर्डे प्रसिद्ध आहेत. तुर्डे नगरसेवक असलेला वार्ड हा पालिकेच्या एल वार्डात येतो. याच वार्डातील क्रांतीनगरमध्ये एका सुलभ शौचालयाचं काम सुरू होतं. शौचालयाचं कामात दिरंगाई होत असल्यामुळे सोमवारी सायंकाळी तुर्डे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला प्रथम मनसेच्या कार्यालयात नेलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्या कंत्राटदाराला कुर्ला परिसरातील निर्जनस्थळी नेत मारहाण केली. या मारहाणीत कंत्राटदाराच्या छातीच्या बर्गंडीला गंभीर दुखापत झाली आहे.


कंत्राटदाराने केली तक्रार

कंत्राटदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तुर्डे यांना ५० हजार रुपये खंडणी पाहिजे होती. ती देण्यास नकार दिल्यामुळे पहिल्यांदा तुर्डे यांनी मारहाण केल्यानंतर इतर कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती कंत्राटदाराने कुर्ला पोलिसांना दिली. त्यानुसार कुर्ला पोलिस ठाण्यात ३६४(अ), ३८७, ३८५,३२६,३२३,१४३,१४४,१४७,१४८,१४९ भा.दं.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तुर्डे यांना अटक केली आहे.

 मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास तुर्डे यांना कुर्लाच्या दंडाधिकारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.


हेही वाचा - 

६० वर्षांतला सिंचनाचा पैसा गेला कुठं? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, अजितदादांना सुनावलं

राज ठाकरे लवकरच नव्या भूमिकेत?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा