Advertisement

राज ठाकरे लवकरच नव्या भूमिकेत?


राज ठाकरे लवकरच नव्या भूमिकेत?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'राज' लवकरच सर्वांसमोर येणार अाहे. राज ठाकरे अाता राजकारण, व्यंगचित्राव्यतिरिक्त अाणखी एका भूमिकेत दिसणार अाहेत. लवकरच राज ठाकरे हे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक अाणणार अाहेत. मात्र हे पुस्तक अात्मचरित्र असेल की छायाचित्रांच्या स्वरूपात, हे लवकरच समजेल.


राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट

लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तकाच्या तयारीचा भाग म्हणून त्यांनी लतादीदी यांची दुर्मिळ छायाचित्रे असलेल्या पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला भेट दिली. या दोनही संग्रहालयात त्यांनी लतादीदींचे दुर्मिळ फोटो बघितले. व हे फोटो आपल्याला पाठवण्याची विनंतीही त्यांनी सबंधित संस्थेला केली आहे. पुस्तकातून राज ठाकरे लतादीदींचा जीवनपट उलगडणार असल्याचे समजते.


दुर्मिळ फोटोंना दिला उजाळा

संग्रहालयात त्यांनी लता मंगेशकर यांचे दुर्मिळ फोटो, बाबूराव पेंटर, शाहूमहाराज यांचे चित्र काढतानाचे फोटो त्यांनी पाहिले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील जुना स्टुडिओ तसेच एडिटिंग रूमलाही त्यांनी भेट दिली. एनएफएआयच्या मौल्यवान खजिन्यात असलेले लतादीदी यांचे काही तरूणवयातील जुने दुर्मिळ फोटोही त्यांनी पहिले. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र फोटोबायोग्राफीतून मांडले होते. आता त्यांचे लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक कोणत्या रूपात असणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


हेही वाचा -

भावा-बहिणींनो, जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नका- राज ठाकरे

'राम मंदिर जरूर बांधा' पण त्याआधी 'हे' करा! - मनसे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा