Advertisement

'राम मंदिर जरूर बांधा' पण त्याआधी 'हे' करा! - मनसे

काही दिवसांपूर्वी मातोश्रीबाहेर राम मंदिर बनवू, या आशयाचं पोस्टर शिवसेनेने लावले होते. आता त्यावर मनसेने निशाणा साधला आहे.

'राम मंदिर जरूर बांधा' पण त्याआधी 'हे' करा! - मनसे
SHARES

राजकीय पक्ष अनेकवेळा पोस्टरबाजी करत आपलं गाऱ्हाणं मांडत असतात. काही दिवसांपूर्वी मातोश्रीबाहेर राम मंदिर बनवू, या आशयाचं पोस्टर शिवसेनेने लावले होते. आता त्यावर मनसेने निशाणा साधला आहे. शिवसेनेनं राम मंदिर जरूर बनवावं, पण त्याआधी मुंबईतील गणेश मंडळ या विषयाकडेही लक्ष द्यावं, असा सल्ला मनसेने पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.


शिवसेनेला टार्गेट

थोड्या दिवसांत बाप्पाचं आगमन होत असून त्यापूर्वी खड्डेमुक्त रस्ते होणं अपेक्षित होतं. तसंच सार्वजनिक मंडळांना गणेश स्थापनेकरता मंडप उभारण्यास अडचणी येत आहे. मात्र याच सार्वजनिक गणेश मंडळांच्या समस्यांकडे सेनेला वेळ नाही आणि निघाले राम मंदिर बनवायला, अशी पोस्टरबाजी करत मनसेने शिवसेनेला टार्गेट केलं आहे.


काय आहे या पोस्टरमध्ये?

अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरूर बांधा पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेश मंडप बांधा, असा मजकूर या पोस्टरमध्ये छापला आहे. हे पोस्टर शिवसेना भवनच्या समोरच लावण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत राम मंदिर प्रश्नी डिवचले होते. या पोस्टरमुळे राजकिय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती. आता यालाच धरून मनसेने सेनेला डिवचलं आहे. पण आता सेना यावर काय उत्तर देते? ते पहाणे नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा