Advertisement

६० वर्षांतला सिंचनाचा पैसा गेला कुठं? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, अजितदादांना सुनावलं

इतक्या वर्षांमध्ये सिंचनावर खर्च केलेला पैसा गेला कुठं? असा खाेचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांसमोर रविवारी तुफान फटकेबाजी केली.

६० वर्षांतला सिंचनाचा पैसा गेला कुठं? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, अजितदादांना सुनावलं
SHARES

संयुक्त महाराष्ट्र साकार होऊन ६० वर्षे होत अाली, तरी राज्यात पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही, अनेक सरकारं आली आणि गेली, तरी पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये सिंचनावर खर्च केलेला पैसा गेला कुठं? असा खाेचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांसमोर रविवारी तुफान फटकेबाजी केली.काय म्हणाले राज?

  • १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून ते २०१८ पर्यंत राज्यात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. इथं या अगोदरचंही सरकारही इथं बसलंय आणि आताचं सरकारही बसलंय. तेव्हा इतक्या वर्षांत सिंचनावर खर्च केलेला पैसा गेला कुठं असा प्रश्न मला पडला आहे?
  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तील जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल, तर सरकार नेमकं काय करतंय?
  • आतापर्यंतच्या जलसिंचन आणि पाटबंधारे खात्यात जेवढं पाणी मुरलं, ते जर अडवलं असतं, तर महाराष्ट्राची पाण्याची पातळी केव्हाच उंचावली असतील.
  • कुदळ कशी मारायची हे मला ठाऊक आहे, तुम्ही मला फावडं कसं मारायचं ते शिकवा, मी पुढच्या वर्षी नक्की श्रमदान करायला येईन.

यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार इ. उपस्थित होते.

कार्यक्रमात अजित पवार यांनी काही लोक केवळ बोलघेवडे असतात, बोलून निघून जातात, असं म्हणत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कुरघोड्यांमुळेच सिंचनाचं काम नीट झालं नाही, गावखेड्यांचा विकास झाला नाही, असं म्हणत राज यांना प्रतिटोला हाणला.हेही वाचा-

राज ठाकरे लवकरच नव्या भूमिकेत?

मग आरक्षणाचा काय उपयोग? - राज ठाकरेसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा