अपघातानंतर टँकरची तोडफोड

 Chembur
अपघातानंतर टँकरची तोडफोड
अपघातानंतर टँकरची तोडफोड
See all

चेंबूर - भरधाव वेगात असलेल्या मनोज सिंह (33) या दुचाकीस्वाराचा तोल गेल्यानं तो टँकरखाली गेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री चेंबूर परिसरात घडली होती. सुदैवाने या अपघातामध्ये तरुणाचा जीव वाचलाय. मात्र त्याच्या पायाल गंभीर दुखापत झाली असून, त्याला याच परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र या अपघातामध्ये टँकरचालकाची चुकी असल्याचा गैरसमज येथील काही रहिवाशांना झाला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या 7 ते 8 टँकरची तोडफोड केली. याबाबत पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केलाय.

Loading Comments