मालाडमध्ये बाईक चोर जेरबंद


SHARE

मालाड - मालवणी पोलिसांनी चार बाईक चोरांना अटक केली आहे. या चोरांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. या चोरांकडून 19 बाईकही जप्त करण्यात आल्या आहेत. 

मालवणी परिसरात दोन बाईक चोर येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांना मिळाली होती. त्यानुसार खरोडी गावात पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. आर्यन गुप्ता आणि अमन वर्मा अशी या दोघांची नावे आहेत. दोघांनी चौकशी दरम्यान त्यांच्या साथीदारांची नावे उघड केली. या दोघांसोबत जुनैद आणि अजून एक अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केले. गोरेगाव, जोगेश्वरी, बोरिवली, वांद्रे आणि कस्तुरबा भागातल्या 19 बाईक चोरल्या होत्या. यामध्ये होंडा, यूनिकॉर्न, बजाज बॉक्सर या कंपन्यांच्या बाईक्स आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या