टॅक्सीच्या धडकेत बाइकस्वार गंभीर जखमी

 Sion
टॅक्सीच्या धडकेत बाइकस्वार गंभीर जखमी
Sion, Mumbai  -  

टॅक्सी चालकानी एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री सायनच्या रामदेव हॉटेलसमोर घडली. यात हसन अली अब्बास वधुवाला (26) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला चर्नीरोड येथील सोफीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टॅक्सी चालकाविरोधात रविवारी गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली असून त्याची टॅक्सी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृदुला लाड यांनी दिली.

हसन अली अब्बास वधुवाला हा चर्नीरोड येथील राहणारा आहे. आपल्या वैयक्तिक कामानिमित्ताने तो शनिवारी सायनला आला होता. काम उरकून पुन्हा घरी जायला निघाला असता सायन रेल्वे स्थानकाहून सायन जंक्शनच्या दिशेकडे जाणाऱ्या एका टॅक्सी चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात हसन अलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर सायन रुग्णालयात प्रथमोपचार करून रविवारी सोफीया रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading Comments