दहिसरमध्ये अज्ञाताने पेटवल्या 6 बाईक

 Rawalpada
दहिसरमध्ये अज्ञाताने पेटवल्या 6 बाईक

दहिसर - रावलपाडा येथे रविवारी पहाटे 4 च्या सुमारास बाईक्स जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अज्ञाताने लावलेल्या या आगीत दोन ठिकाणी सहा बाईक्स जळून खाक झाल्या आहेत. 

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दहीसरमधील तांबे शाळेच्या समोर बाईक्स जाळल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर दुसरीकडे तिथूनच 200 मीटर लांब असलेल्या ज्ञानेश्वर नगरमध्ये बाईक्स जाळल्याची घटना घडली. दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 6 बाईक्स जळाल्या आहेत. 

सकाळी दुधवाला जेव्हा दुध टाकण्यासाठी आला तेव्हा त्याला बाईक्सला आग लागल्याचे दिसले आणि त्याने त्वरित आरडाओरडा करून लोकांना जमा करत आग विझवली. दुधवाल्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी योग्य तपास करून अज्ञात आरोपीला लवकरात लवकर पकडून बेड्या ठोकल्या जातील असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष सावंत यांनी सांगितले. दोन्ही ठिकाणी पोलिसांचे विशेष पथक ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली.

Loading Comments