रणजित सिंगला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

संचालकपदी तसेच कर्ज परतावा समितीमध्ये असतानाही एचडीआयएलकडून कर्ज परत मिळावे यासाठी रणजितने कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे समोर आले.

रणजित सिंगला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा रणजितसिंग याला शनिवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनीया गैरव्यवहारा प्रकरणी सिंगच्या घडी छापेमारी केली होती.

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून फास आवळण्यास सुरूवात झाली आहे. ईडीने शनिवारी भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा मुलगा रणजित सिंग याला अटक केली. संचालकपदी तसेच कर्ज परतावा समितीमध्ये असतानाही एचडीआयएलकडून कर्ज परत मिळावे यासाठी रणजितने कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे समोर आले. रविवारी त्याला विशेष सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांचे पथक त्याला घेऊन सायन कोळीवाडा येथे पोहोचले.

सायन कोळीवाडा येथील कर्मक्षेत्र इमारतीमधील त्याच्या फ्लॅटमध्ये ईडीने रविवारी छापा टाकून झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांना घराबाहेर ठेवण्यात आले. सुमारे दीड ते दोन तास रणजितच्या फ्लॅटमध्ये शोध मोहीम सुरू होती. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती नेमके काय लागले हे समजू शकले नाही. या झाडाझडतीनंतर रणजितला पुन्हा चौकशीसाठी नेण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित विषय