अरे हे काय? पालिका अभियंत्याची मालमत्ता पगाराच्या १३०७ टक्के!


अरे हे काय? पालिका अभियंत्याची मालमत्ता पगाराच्या १३०७ टक्के!
SHARES

मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अनिल मिस्त्री (५१) याने मिळकतीच्या १३०७ टक्के अधिक अपसंपदा जमा केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या मुंबई कक्षाने मिस्त्रीसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


इतकी रक्कम केली जमा

मार्च १९९० ते जुन २०१७ या कार्यकालादरम्यान अनिल मिस्त्री याने ७,७२,४८,३८१ इतकी रक्कम जमा केल्याची माहिती एसीबीच्या चौकशीतून उघड झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जमा केलेली अपसंपदा ही त्याच्या मिळकतीच्या १३०७.८ टक्के असल्याचा दावा एसीबीनं केला आहे.

याप्रकरणी अनिल मिस्त्रीची पत्नी आकृती आणि इंदुमती मिस्त्री यांना देखील आरोपी बनवण्यात आलं आहे. या दोघांनी प्रत्येकी ३८ लाख २६ हजार आणि पाच कोटी २६ लाखांची मालमत्ता जमा केल्याचा दावा एसीबीनं केला आहे.



हेही वाचा

जामिनाच्या बदल्यात प्रिंटर मागणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा