वाड्यात बाॅयलरचा स्फोट होऊन ३ कामगारांचा मृत्यू


वाड्यात बाॅयलरचा स्फोट होऊन ३ कामगारांचा मृत्यू
SHARES

वाडा तालुक्यातील तोरणा इस्पात कंपनीत बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाॅयलरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाला तर १ कामगार जखमी झाला आहे.


कुणाचा समावेश?

मृतांमध्ये निलेश यादव (२८), सनी वर्मा (२८) आणि संजय गुप्ता (२७) या तिघांचा समावेश आहे. तर या अपघातात विनोद यादव (३५) हा कामगार जखमी झाला आहे. विनोदला नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.


कसा झाला अपघात?

वाडा तालुक्यातील अबिटघर इथं तोरणा इस्पात उद्योग ही कंपनी आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कंपनीत काही कामगार स्क्रॅप वितळवून त्याद्वारे रॉड तयार करत असताना अचानक बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या भक्ष्यस्थानी काही कामगार पडले.

कंपनीत उपस्थित इतर कामगारांनी जखमींना उचलून तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेल, पण तोपर्यंत होरपळून ३ कामगारांचा मृत्यू झाला. तर एका जखमीवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा-

आगीत होरपळतानाही 'त्याला' होती कुटुंबाची चिंता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा