कुणाल खेमू हेल्मेट न घालता चालवत होता बाईक, पोलिसांनी कापला चलान


कुणाल खेमू हेल्मेट न घालता चालवत होता बाईक, पोलिसांनी कापला चलान
SHARES

सेलिब्रिटींकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळतं. त्यात बरेचजण केवळ आपण सिलेब्रिटी आहोत म्हणून हवं तसं वागू शकतो, अशा आवेशात असतात. त्यांच्यासाठी मद्यपान करून गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम मोडणे हे काही नवीन नाही. त्यातच आता अभिनेता कुणाल खेमू याने देखील वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं. वाहतूक पोलिसांनीही चुकीला माफी नाही ही भूमिका घेत त्याला ५०० दंड ठोठावला आहे.


त्याचे फोटो व्हायरल

दुचाकीहून फिरत असताना कुणालने हेल्मेट घातला नव्हता. त्यावेळी वाहतूक नियंत्रण कक्षाने कुणालचे फोटो काढत त्याला ईचलान पाठवला. सोबतच वाहतूक पोलिसांनी त्याचे फोटो आणि ई-चलानच्या कारवाईचा स्क्रिन शॉट कुणालच्या ट्विटरवर टॅग केला. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत कुणाल विदाऊट हेल्मेट दुचाकी चालवताना दिसत आहे.


ट्विटरव मागितली माफी

वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मिळताच त्याने चूक कबुल करत माफी मागतली. आणि यापुढे वाहतूक नियमांचं उल्लघंन न करण्याचं ट्वीट केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा