तेलतुंबडे, नवलखा यांना अटकेपासून दिलासा


SHARE

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कोरेगाव-भीमा हिंसाचार तसंच नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, प्रो. आनंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांना अटकेपासून एका दिवसाचं संरक्षण दिलं आहे.

नवलखा आणि तेलतुंबडे यांनी न्यायालयात याचिका दाखल करत पुणे पोलिसांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार तसंच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या एल्गार परिषदेला माओवाद्यांचा पाठिंबा होता, यातूनच हिंसाचाराला चालना मिळाल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला होता.

त्यानुसार या याचिकेवर गुरूवारी सुनावणी करताना न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने तिघांनाही अटकेपासून दिलासा दिला. याआधी सर्वोच्च न्यायालयाने वरावरा राव, गौतम नवलखा, अरूण फरेरा, व्हर्नन गोन्साल्वीस आणि सुधा भारद्वाज यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. यापैकी वरावरा राव, गोन्साल्वीस, भारद्वाज आणि फरेरा यांची नजरकैदेची मुदत संपल्यावर त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं.हेही वाचा- 

नक्षलवादी कनेक्शन: नवलखा, तेलतुंबडे यांना न्यायालयाचा दिलासा

नक्षलवादी कनेक्शन: फरेरा, गोन्साल्वीस यांना पोलिस कोठडीसंबंधित विषय
ताज्या बातम्या