मालकिणीला ब्लॅकमेल करून नोकराने साधली संधी

पैसे देता येत नसल्यामुळे त्याने मालकिनीचे ८ ग्रॅम वजनाचे कर्णफुल, सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये उकळले.

मालकिणीला ब्लॅकमेल करून नोकराने साधली संधी
SHARES

मुंबईच्या पंतनगर परिसरात नोकरानेच मालकिणीला ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐवढ्यावरच न थांबता मालकिनीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून १ लाख ६० हजार रुपयांचे मौल्यवान दागिने नोकराने चोरल्याचे पुढे आले आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर मालकिनीने पंतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघकीस आला आहे.

हेही वाचाः- देश मंदीच्या खाईत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी शुन्याच्या खाली

मूळचा उत्तरप्रदेशचा राहणारा असलेला आरोपी रामजीयावन भवानी प्रसाद वर्मा (२१) हा मुंबईत मुंब्रा देवी काॅलनी परिसरात राहतो. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता. रामजीयावन हा पीडित महिलेच्या गावचाच असल्याने त्याला नोकरीची गरज होती. त्याची घरची परिस्थीती पाहून तक्रारदार महिलेने नवऱ्याला सांगून त्याला त्यांच्याकडेच कामाला ठेवले. काही दिवस राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे तो तक्रारदार महिलेकडेच रहात होता. मात्र उपकाराची जाणीव नसलेल्या रामजीयावनची त्याच्या मालकीनीवर वाईट नजर होती. ऐके दिवशी मालक घरी नसल्याचे पाहून रामजीयावनने मालकिणीवर जबरदस्ती केली. मालकिणीने आरडा ओरडा केला असता. त्याने तिला आणि तिच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने त्याच्या मोबाइलवर मालकिणीचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्या फोटोच्या आधारे तो मालकिनीला धमकवायचा.

हेही वाचाः- महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नको- नारायण राणे

चालू वर्षभरात त्याने अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तक्रारदार महिलेच्या घरी आणि घाटकोपर येथील एका पत्यावर बोलावून अत्याचार केले. ऐवढ्यावरच न थांबता कालांतराने त्याने मालकिनीकडे पैशांची मागणी सुरू केली. पैसे देता येत नसल्यामुळे त्याने मालकिणीचे ८ ग्रॅम वजनाचे कर्णफुल, सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम १ लाख २० हजार रुपये उकळले. मात्र दिवसेंदिवस रामजीयावनच्या मागण्या वाढतच होत्या, रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पंतनगर पोलिसात धाव घेत रामजीयावन विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी रामजीयावन वर्मा विरोधात ३७६(एन), ३८६,३२३,५०४(२),५०६ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा