Advertisement

महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नको- नारायण राणे

महाराष्ट्राला कर्तृत्वान मुख्यमंत्री हवा आहे, ड्रायव्हर नको असं भाजप खासदार नारायण राणे म्हणाले.

महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नको- नारायण राणे
SHARES

स्वत: कार चालवत मंत्रालयात गेल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. त्यावर भाष्य करताना महाराष्ट्राला कर्तृत्वान मुख्यमंत्री हवा आहे, ड्रायव्हर नको असं भाजप खासदार नारायण राणे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडेतोड शब्दांत हल्ला चढवला. 

त्यावर प्रतिक्रिया देताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे म्हणाले, कोणत्याही विषयाचं ज्ञान नसलेले मुख्यमंत्री राज्याला लाभल्याने महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. याला शिवसेनेसोबतच अन्य दोन घटकपक्षही जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षभरात लोकहितासाठी, हिंदुत्वासाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? हा प्रश्न आहे. कोरोनाचे बळी आणि रुग्णांच्याबाबतीत महाराष्ट्र राज्य एक नंबर वर आहे. कामामध्ये शून्य आणि याबाबतीत एक नंबर, अशी परिस्थिती आहे. मागच्या ६ महिन्यांमध्ये ६५ हजार कोटी रुपयांचं कर्ज काढून या सरकारने राज्याला दिवाळखोरीत नेल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.

हेही वाचा- हिंदुत्व धमन्यांमध्ये असावं लागतं, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

मुलाखतीच्या माध्यमातून विरोधकांना धमक्या देणं, ईडी, सीबीआयला धमक्या देण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आतापर्यंत हात धुवत होतो, आता हात धुवून मागे लागेन हे वाक्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही. धमक्या देऊ नका, कोण कुणाच्या मागे लागेल हे कळेल. आम्ही मागे लागलो तर झोप येऊ देणार नाही. १०० जणांच्या कुंडल्या माहिती आहेत. बंद दरवाजा आडच्या मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्याही अनेक गोष्टी ठावूक आहेत, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

तुमचं ५६ आमदारांचं सरकार किती दिवस चालेल? असा प्रश्न विचारताना महाराष्ट्रासाठी हे सरकार पोषक नाही. हे सरकार गेल्यानंतर अन्य दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत युती होऊ शकते किंवा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा अंदाज देखील नारायण राणे यांनी व्यक्त केला.

(bjp mp narayan rane criticised maharashtra cm uddhav thackeray saamana interview)

हेही वाचा- मग उद्धव ठाकरेंचं हिंदुत्त्व दिसत का नाही? मनसेचा सवाल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा