Advertisement

हिंदुत्व धमन्यांमध्ये असावं लागतं, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य करणारा भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.

हिंदुत्व धमन्यांमध्ये असावं लागतं, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
SHARES

'हिंदुत्व हे अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्टी अशी सोडता येत नाही. हिंदुत्वाचंही तसंच आहे. सोडून द्यायला ते काही धोतर नाही, असं म्हणत (shiv sena) शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य करणारा भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना विशेष मुलाखत दिली. यावेळी ते बोलते होते. 

संसदेतील राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राम मंदिर, अनलाॅक प्रक्रियेत राज्यातील मंदिरं उघडण्यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने लक्ष्य केलं. हिंदुत्वावरून प्रश्न उपस्थित करत अडचणीत आणलं. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्व सोडून 'सेक्युलर' झालात का? असा खोचक प्रश्न देखील विचारला. 

हेही वाचा- मनसे हा सुपारी घेऊन काम करणारा पक्ष, अनिल परब यांची टीका

या सगळ्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. देवळात घंटा बडवणारा नव्हे, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू त्यांना हवा होता. ते ९२-९३ साली त्यांनी करून दाखवलं. पूर्ण बहुमताचं सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची यांची हिंमत नव्हती. ते न्यायालयाच्या निकालाने साध्य झालं. त्यामुळं आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. 

फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं हे हिंदुत्व आहे काय? त्यानं कोरोना (coronavirus) नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका. या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्यामुळं निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व शिकवू नका. तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व नकोच, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लागावली.

हिंदुत्व हे अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्टी अशी सोडता येत नाही. हिंदुत्वाचंही तसंच आहे. सोडून द्यायला ते काही धोतर नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं.

(maharashtra cm uddhav thackeray slams bjp and bhagat singh koshyari in saamana interview)

हेही वाचा- संविधानाची घेतलेली शपथ गहाण ठेवली का?- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय