Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

मनसे हा सुपारी घेऊन काम करणारा पक्ष, अनिल परब यांची टीका

मनसे हा सुपारी घेऊन काम करणारा पक्ष असल्याची टीका शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

मनसे हा सुपारी घेऊन काम करणारा पक्ष, अनिल परब यांची टीका
SHARES

येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) भाजपसोबत जाणार की नाही, हे येत्या काही दिवसांत कळेलच. परंतु मनसे हा सुपारी घेऊन काम करणारा पक्ष असल्याची टीका शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

मुंबई महापालिका निवडणुकीत (bjp) शिवसेना गेल्या वेळेप्रमाणे एकटी लढणार की महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र घेऊन लढणार याविषयी प्रश्न विचारला असता अनिल परब यांनी सांगितलं की, मुंबई महापालिका निवडणूक एकत्रित लढवायची की नाही, याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्रित चर्चा करुन घेतील. आताच त्यावर भाष्य करणं कठीण आहे. परंतु शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मुंबई महापालिका निवडणूक लढवेल हे नक्की.

हेही वाचा- ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या

पुढच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिका मुख्यालयावर शिवसेनेचा (shiv sena) नव्हे, तर भाजपचा भगवा फडकेल आणि भाजप बहुमतापेक्षा जास्त जागा घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन करेल, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. परंतु हा विश्वास नसून ते स्वप्न बघत आहेत कारण त्यांचा पुन्हा स्वप्नभंग होणार असून त्यापुढची पाच वर्षे त्यांना स्वप्न बघतच काढावी लागणार आहेत. भाजप सत्तेविना अस्वस्थ झाली आहे. कार्यकर्ते बिथरुन कुठे जाऊ नयेत म्हणून त्यांना असं बोलावं लागत आहे, असंही अनिल परब म्हणाले. 

तर महापालिकेत भाजप-मनसे युतीच्या शक्यतेवर बोलताना अनिल परब यांनी मनसेची सुपारी घेऊन काम करणारा पक्ष म्हणून हेटाळणी केली. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाल्यानंतर राज ठाकरे (raj thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मनसेने लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजपच्या नेत्यांवर हल्ले केले. आता त्यांच्याबरोबरच गेल्याने काय होतं? हे त्यांना पुढं कळेल, अशा शब्दांत अनिल परब यांनी मनसेवर टीका केली. शिवाय मनसेच्या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचंही सांगितलं.

(shiv sena mla anil parab criticised raj thackeray led mns ahead of bmc election)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा