Advertisement

ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या

या हत्येचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर जमील यांना डोक्यात गोळी झाडताना स्पष्ट दिसत आहे.

ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील पदाधिकारी जमील शेख यांची भर रस्त्यात डोक्यात गोळी झाडू हत्या करण्यात आली. या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. राबोडी परिसरात दुपारी ही घटना घडली. जमील हे मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष होते.  

सोमवारी दुपारी शेख राबोडी परिसरात दुचाकीवरून जात होते. यावेळी मागून आलेल्या व हेल्मेट घालेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने शेख यांच्या दिशेने पिस्तूलातून झाडलेली गोळी शेख यांच्या डोक्यात लागली. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी शेख यांना गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

या हत्येचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर जमील यांना डोक्यात गोळी झाडताना स्पष्ट दिसत आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस दोन संशयिताचा शोध घेत आहेत. जमील यांची हत्या झाल्याचे कळताच राबोडी परिसरात मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झाले होते. मनसे उपाध्यक्ष जावेद शेख, मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे घटनास्थळी आले. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरात लावला होता. 

जमील शेख यांची हत्या ही स्थानिक नेत्याने किंवा बिल्डरने केली असल्याचा संशय यावेळी मनसेच्या नेत्यांनी बोलून दाखवला. या हल्ल्यामागचे कारण हे क्लस्टर योजना आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध लावावा, मनसेला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. हेही वाचा -

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे

महाराष्ट्र : २०२० मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

यंदा भाडेवाढ न करण्याचा बेस्टचा निर्णय


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा