Advertisement

मग उद्धव ठाकरेंचं हिंदुत्त्व दिसत का नाही? मनसेचा सवाल

उद्धव ठाकरे हे सरकार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.

मग उद्धव ठाकरेंचं हिंदुत्त्व दिसत का नाही? मनसेचा सवाल
SHARES

उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये हिंदुत्वाचं रक्त असेल तर ते दिसत का नाही? सामनाला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी केवळ भाजपला धमकावण्याचं काम केलं आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ते काहीही बोलत नाहीत. उद्धव ठाकरे हे सरकार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.

वृत्तसंस्थेशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची सामनामधील मुलाखत ही माझा सामना, माझी मुलाखत या प्रकारातील होती. ते सपशेल अपयशी ठरले आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते जनतेच्या हिताचं काहीही बोलले नव्हते. तर आता सामनाला दिलेली मुलाखत ही माझा सामना, माझी मुलाखत या प्रकारातील होती. या मुलाखतीमधून त्यांनी केवळ भाजपाला धमकवण्याचं काम केलं.

हेही वाचा- काहीही झालं तरी वाढीव वीजबिल भरू नका- राज ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या धमन्यांमध्ये खरंच हिंदुत्वाचं रक्त असेल तर ते दिसत का नाही? वीज बिल, बेरोजगारीसारख्या सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ते का बोलत नाहीत? उद्धव ठाकरे हे सरकार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत,अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत 'हिंदुत्व हे अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्टी अशी सोडता येत नाही. हिंदुत्वाचंही तसंच आहे. सोडून द्यायला ते काही धोतर नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप (bjp) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला.

दुसरीकडे वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शुक्रवारी ठिकठिकाणी महावितरणच्या कार्यालयांवर मोर्चा काढला होता. जोपर्यंत सरकार वाढीव वीज बिल माफ करत नाही, तोपर्यंत वीज बिल भरू नका असा आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.

(mns leader sandeep deshpande criticised maharashtra cm uddhav thackeray over extra electricity bill during lockdown)

संबंधित विषय
Advertisement