अंगावरून कार जाऊनही चिमुरडा वाचला!

रस्त्यावर फुटबाॅल खेळणाऱ्या मुलांपैकी ६ ते ८ वर्षांचा लाल टी शर्ट घातलेला एक मुलगा बुटाची लेस बांधण्यासाठी म्हणून खाली बसला. तेवढ्यात या महिलेने कार सुरू करून पुढे आणली आणि तिला रस्त्यावर खाली बसलेला मुलगा न दिसल्याने कार थेट त्याच्या अंगावरून नेली.

अंगावरून कार जाऊनही चिमुरडा वाचला!
SHARES

मुंबईतील चेंबूर परिसरातील व्हायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज बघून तुमच्या तोंडून ''देव तारी त्याला कोण मारी?'' ही म्हण आल्यावाचून राहणार नाही. सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर फुटबाॅल खेळणाऱ्या एका लहान मुलाच्या अंगावरून कार जाऊन देखील हा मुलगा दुसऱ्याच क्षणाला उठून फुटबाॅल खेळू लागल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.


नक्की काय झालं?

चेंबूर परिसरात मंगळवार २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता काही लहान मुले रस्त्यावर फुटबाॅल खेळत होती. तर दुसऱ्या बाजूला एक महिला पार्किंग केलेली कार बाहेर काढत होती. त्याच वेळेस फुटबाॅल खेळणाऱ्या मुलांपैकी ६ ते ८ वर्षांचा लाल टी शर्ट घातलेला एक मुलगा बुटाची लेस बांधण्यासाठी म्हणून खाली बसला. तेवढ्यात या महिलेने कार सुरू करून पुढे आणली आणि तिला रस्त्यावर खाली बसलेला मुलगा न दिसल्याने कार थेट त्याच्या अंगावरून नेली.


साधा ओरखडाही नाही

मुलगा या कारच्या धडकेने खाली पडला आणि कारखाली आेढला गेला. सुदैवाने चाकाखाली न येता तो कारच्या बरोबर मधल्या बाजूस जमिनीवर पडल्याने संपूर्ण कार त्याच्या अंगावरून गेली आणि दुसऱ्याच क्षणी हा मुलगा उठून आपल्या मित्रांच्या दिशेने पळाला. एवढी मोठी दुर्घटना होऊनही मुलाच्या अंगावर साधा ओरखडाही न उमटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

काळजाचा ठोका चुकवणारी ही सारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



हेही वाचा-

कुमार पिल्लई गॅंगच्या हस्तकाला अटक

अभिनेते दिलीप ताहिल यांनी दारूच्या नशेत केलं अॅक्सिडेंट!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा