अभिनेते दिलीप ताहिल यांनी दारूच्या नशेत केलं अॅक्सिडेंट!


अभिनेते दिलीप ताहिल यांनी दारूच्या नशेत केलं अॅक्सिडेंट!
SHARES

हिंदी अभिनेते दिलीप ताहिल यांना मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री दारूच्या नशेत कार चालवण्याच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. दिलीप ताहिल यांनी कार चालवत असताना एका आॅटो रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत आॅटो रिक्षात बसलेला तरूण आणि तरूणी जखमी झाले.


पळ काढण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या धडकेनंतर ताहिल यांनी घटनास्थळाहून पळ काढण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने त्यांना पळ काढता आला नाही. जखमी तरूण आणि तरूणीने त्यांचा पाठलाग करून त्यांना कारबाहेर खेचून काढलं. तेव्हा त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही तक्रारीत नोंदवण्यात आला आहे.


रक्ताची चाचणी

पोलिसांनी या दुर्घटनेतील तिघाजणांची वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर ताहिल यांना 'ड्रंक अँड ड्राइव्ह' तसंच बेपर्वाईने कार चालवण्याच्या गुन्ह्यात अटक केली. मुंबईतील खार पोलिस ठाण्यातील इन्स्पेक्टरने सांगितलं की, ताहिल यांनी रक्ताचे नमुने देण्यात मनाई केली होती.


जामिनावर सोडलं

सध्या दिलीप ताहिल यांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. ताहिल यांनी बाजीगर, राजा, इश्क, सोल्जर अशा अनेक हिट हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.



हेही वाचा-

परदेशी महिलांनी दुकानातून मोबाइल चोरला; मुलुंडमधील घटना

वांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून महिलेची गळा चिरून हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा