वांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून महिलेची गळा चिरून हत्या


वांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून महिलेची गळा चिरून हत्या
SHARES

वांद्र्यात पैशांच्या व्यवहारातून एका महिलेनंच दुसऱ्या महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वांद्रे पश्चिमेकडील चॅपल रोड इथं असलेल्या लव्हली स्टोअरजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी महिला आरोपीला सोमवारी अटक केली आहे.


'अशी' केली हत्या

अर्चना असं या आरोपी महिलेचं नाव आहे. अर्चना आणि मृत महिला यांच्यामध्ये वांद्र्यातील रिलायबल कन्स्ट्रक्शनच्या एका प्लॉटवरील पत्र्याच्या शेडमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला.

हा वाद वाढत गेल्याने अर्चनाने दुसऱ्या महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरला आणि तिथून पळ काढला. या प्रकरणी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपी अर्चनाला अटक केली आहे.



हेही वाचा-

डीटूएच कंपनीला गंडवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या १०३ मंडळांवर गुन्हे दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा