प्रेयसीशी झालेल्या भांडणातून खाडीपूलाहून प्रियकराने टाकली उडी


प्रेयसीशी झालेल्या भांडणातून खाडीपूलाहून प्रियकराने टाकली उडी
SHARES

प्रियकर आणि प्रेयसीमध्ये या ना त्या कारणावरून भांडण होणे नवीन नाही. मात्र टोकाच्या झालेल्या भांडणातून प्रियकराने चक्क खाडीपूलाहून उडी टाकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने पोलीस आणि मच्छीमारांच्या मदतीने या तरुणाला वाचवण्यात यश आले आहे.

नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रवी रेड्डी असं या तरुणाचं नाव आहे. तो मानखुर्द इथं राहणार आहे. रवी रेड्डी आणि त्यांची प्रेयसी दोघे वाशी खाडीपुलावर भांडत होते. दोघांमध्ये कुठल्या तरी मुद्यावरून कडाक्याचे भांडण झाले होते. भांडता भांडता रवी रेड्डी याने थेट खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तरुणीला देखील चक्कर येऊन ती पुलावरच पडली. पुलावर पडलेल्या या मुलीला पाहून पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी पोलिसांना सांगितले. त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस आणि वाशी पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांनी कोळी बांधव महेश सुतार यांच्या मदतीने लागलीच होडीच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली. तेव्हा रवी रेड्डीचे शरीर पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. लागलीच तरुणाला होडीत घेऊन त्याच्या शरीरात शिरलेलं पाणी बाहेर काढल्यामुळे या तरुणाचे जीव वाचला. यापूर्वी अनेकांचे जीव वाचवणाऱ्या महेश सुतार याचे पोलिसांनी कौतुक केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा