महिलांची वेणी कापण्याच्या घटना मुंबईतही!


महिलांची वेणी कापण्याच्या घटना मुंबईतही!
SHARES

उत्तर भारतानंतर आता माया नगरी मुंबईतही वेणी कापण्याच्या घटनांना सुरुवात झाली आहे. भायखळ्यात दोन महिलांच्या वेणी कापल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच बुधवारी रात्री वडाळा येथे एका मुलीची वेणी कापल्याची माहिती समोर आली आहे.

मी रात्री झोपलेले असताना अचानक माझे डोके दुखू लागले. त्यामुळे ही बाब पतीला सांगितल्यानंतर त्यांनी डोकेदुखीवरचं औषध खायला सांगितले. त्याचवेळी काही तरी अंगावर पडल्याचे जाणवले. त्यामुळे घाबरून उठून बसले आणि लाईट लावली. तेव्हा माझी वेणी कापलेली होती.

रोशनी मन्सूरी, रहिवासी, भायखळा


बुधवारी संध्याकाळची दुसरी घटना

मी केस विंचरत असताना अचानक माझ्यासमोर अंधार पसरला आणि माझे डोके दुखू लागले. त्यामुळे आईने मला विश्रांती घ्यायला सांगितले. पण थोड्या वेळाने डोकेदुखी थांबली, तेव्हा माझी वेणी कापलेली दिसली.

अनिता, रहिवासी, वडाळा

या घटनेनंतर अनिताच्या आईने तिला जवळच्या रुग्णालयात नेले आणि घडलेली घटना डॉक्टरांना सांगितली. पण हा अंधविश्वास असल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला डोकेदुखीचे औषध देऊन घरी पाठवले.


आग्रीपाड्यातली तिसरी घटना

मुंबईच्या आग्रीपाडा येथे एका 40 वर्षाच्या महिलेने आपली वेणी कापल्याची तक्रार दाखल केली आहे. पण ही वेणी कापणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? याची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही. त्यामुळे ही एक अंधश्रद्धा असल्याने यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा