अबब पोटात सापडल्या कोकेनंने भरलेल्या कँप्सूल

डॉक्‍टरांनी त्याच्या पोटातून या 53कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

अबब पोटात सापडल्या कोकेनंने भरलेल्या कँप्सूल
SHARES
तुम्ही फोटोत पहात असलेले एक्सरे हे कुठल्याही रुग्णाचे नाही आहेत. हे एक्सरे कुणाच्या दुखापतीचे ही नाही आहेत. तर या एक्सरेत दिसत आहे तब्बल कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज, ब्राझील येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका  23 वर्षीय तरुणीच्या पोटात हे ड्रग्ज मिळून आले  आहे. जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरांनी पाच दिवस अथक प्रयत्न कन तिच्या पोटातून कॅप्सूल काढल्या असून तिच्याकडून दोन कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
 या प्रकरणी तिला गुप्तचार विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.

मूळचा ब्राझीलचा रहिवाशी असलेला जोस हेन्रीक डिसिल्वा डॉमिन्ग्यूस(23)ला  14 मार्चला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. इथोपियन एअरलाईन्सने तो मुंबईत आला होता. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्‍टरांनी त्याच्या पोटातून या 53कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. 

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन534 ग्रॅम असून त्याची किंमत एक कोटी 60 लाख रुपये आहे. चौकशीत त्याने ब्राझीलमधील साओ पावलो येथील एका व्यक्तीने हे कोकेन दिले होते. ते मुंबईत वाहून आणण्यासाठी त्याला एक हजार अमेरिकन डॉलर(सुमारे 70 हजार रुपये) देण्याचे कबुल केले होते. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला. त्यानंतर तो टुरिस्ट विसावर भारतात आला. त्याचा तिकीटखर्चही आरोपीने केला होता. त्या आरोपीची ओळख पटली आहे. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा