खून नात्यांचा


SHARE

कुलाबा - मालमत्तेच्या वादातून भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना आल्ड नेव्हीनगर परिसरात घडली आहे. श्याम नायडू असं आरोपीचे नाव आहे. आरोपीने फक्त बहिणीवरच नाही तर स्वत:च्या आईवरही चाकूने हल्ला केला. मंगळवारी दारूच्या नशेत परतलेल्या श्याम याचे राजश्रीसोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर श्यामने रागाच्या भरात घरातील चाकूने राजश्रीचा गळा चिरला. राजश्रीला वाचवण्यासाठी धावलेल्या आईवरसुद्धा श्यामने चाकूने वार करून घरातून पळ काढला. शेजाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने श्यामच्या आईला जी. टी. रुग्णालयात दाखल केले. श्याम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या