किरकोळ वादातून भावानेच केला भावाचा खून

  Dadar East
  किरकोळ वादातून भावानेच केला भावाचा खून
  मुंबई  -  

  घराच्या पुरुषाने दारू प्यायल्याने अनेकदा कुटुंबात खटके उडतात. त्याचे रुपांतर भांडणात आणि त्यानंतर थेट हाणामारीत होते. परंतु, दादर (पू) येथील गौतमनगरमध्ये राहणाऱ्या रोहीत चंद्रकांत वाघेला (27) याने भाऊ रमेश वाघेलाने दारू पिऊन किरकोळ वाद घातल्याने त्याची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात आरोपी रोहीत याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

  रमेशने दारू पिऊन दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर असलेल्या एका देशी बारमध्ये धिंगाणा घातला होता. ही बाब भाऊ रोहीत याला कळताच तो रमेशला आणण्यासाठी गेला असता त्याने रोहीतबरोबर भांडायला सुरुवात केली. हा किरकोळ वाद काही क्षणातच पेटला आणि रोहीतने रागाच्या भरात दारू प्यायलेल्या रमेशला थेट एका झाडाच्या कठड्यावर आपटले. त्यात रमेश गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी रोहीतला ताब्यात घेतले असून त्याच्यावर 302 नुसार हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.