ओव्हरटेकच्या वादातून चाकूहल्ला


ओव्हरटेकच्या वादातून चाकूहल्ला
SHARES

मरिन ड्राइव्ह - भरधाव स्कूलबस चालवणाऱ्या बसचालकानं ओव्हरटेकच्या वादातून एका कारचालकावर चाकूनं हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मरिन ड्राइव्ह उड्डाणपुलावरून भरधाव स्कूलबस चालवणाऱ्या भरत देसाई या चालकाचा फैज नावाच्या कारचालकाशी ओव्हरटेक करण्यावरून वाद सुरू झाला. या वेळी स्कूलबसमधील अखिलेश सिंग नावाच्या क्लिनरने चालकाच्या सांगण्यावरून त्याच्या हातात मोठा चाकू दिला. त्या चाकूनं या चालकानं फैजच्या गळ्यावर वार केला. मात्र त्याने आपला हात मध्ये आणून हा वार झेलला. ही थरारक घटना पाहणाऱ्यांनी बसचालकाला पकडून फैजचे प्राण वाचवले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आरोपी बसचालकाला अटक केल्याची माहिती मरिन ड्राइव्ह पोलिसांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा