अभिनेत्रीचे खासगी फोटो शेअर केल्याने कास्टिंग डिरेक्टरला अटक

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत आहे.

अभिनेत्रीचे खासगी फोटो शेअर केल्याने कास्टिंग डिरेक्टरला अटक
SHARES

मुंबईमध्ये २८ वर्षीय कास्टिंग डिरेक्टरला अटक करण्यात आली आहे. या दिग्दर्शकाने अभिनेत्रीच्या परवानगी शिवाय तिचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत आहे.

 हेही वाचाः- तारक मेहताचे चित्रीकरण सुरु राहू द्या, निर्मात्याची सरकारकडे मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, या दिग्दर्शकाचे नाव महावीर तक उर्फ नकुल आहे. तसेच या अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड देखील कास्टिंग डिरेक्टर आहे. काही महिन्यांपूर्वी महावीरने अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडला एका मालिकेतील कास्टिंगच्या कामानिमित्त तीन लाख रुपये दिले होते. पण काही कारणास्तव ते काम होऊ शकले नाही. त्यामुळे महावीरने अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडकडून ते पैसे परत मागितले आणि रागात त्याचा मोबाईल देखील घेतला.

 हेही वाचाः- Corono virus:  मुंबईत बार, पब, डिसको, आॅर्केस्ट्रा बारवर बंदी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्रीचे बॉयफ्रेंडसोबतचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची माहिती तिला एका मित्राने दिली. त्यानंतर अभिनेत्रीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात छेडछाड आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासणीत महावीरने सोशल मिडियावर फेक अकाऊन्ट तयार केल्याचे समोर आले आहे. 


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा