मानखुर्द अपहरणप्रकरणी आणखी दोघे अटकेत

 Mandala
मानखुर्द अपहरणप्रकरणी आणखी दोघे अटकेत

मुंबई - दीड वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची अडीच लाखात विक्री करणाऱ्या महिला टोळीला दोन दिवसांपूर्वी मानखुर्द पोलीसांनी गोव्याहून अटक केली होती. सोमवारी या महिलाना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्यांच्या अधिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी माला वानखेडे (४०) आणि गणेश साळे (२७) यांनाही अटक केली आहे. मानखुर्द पोलिसांनी उल्हासनगरहून या दोघांना अटक केल्याची माहिती झोन 6चे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.

Loading Comments